महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
वैद्यकीय क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर व अग्रगण्य असणारे श्रीरत्न हॉस्पिटल आज गेली सत्तावीस वर्षे अखंड रुग्णसेवेसाठी तत्पर आहे.
कराड,पाटण, इस्लामपूर, कडेगाव, सांगलीसह आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये श्रीरत्न हॉस्पिटलच रुग्णसेवेच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे. याच खरं श्रेय जातं ते म्हणजे या हॉस्पिटलच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत उभारनित आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या डॉ.संजय पवार व डॉ.सुनंदा पवार यांच. अथक परिश्रमाने व रुग्णसेवेच्या प्रदीर्घ अनुभवाने डॉ. संजय पवार यांनी आजवर लाखो रुग्णांना जीवनदान दिले. आज लाखो रुग्ण त्यांचे ऋणी आहेत. रुग्नसेवेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य ही खूप केले आहे.
यामध्ये अनेक मोफत शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब व आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार केलेत. त्यामुळेच श्रीरत्न हॉस्पिटल चे नाव आज सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आवर्जून घेतले जाते.श्रीरत्न हॉस्पिटल व डॉ.संजय पवार यांना जागतिक स्तरावर आपल्या रुग्णसेवेच्या बहुमूल्य कार्याबद्दल अनेक पुरस्कारही सन्मानपूर्वक देण्यात आलेत.
2022 हे साल आजादीचा अमृत महोत्सव म्हणून पूर्ण देशभरात साजरा केल जातय.आणि आणखी एक सुवर्ण असा योगायोग म्हणजे श्रीरत्न हॉस्पिटलचा 27 वा वर्धापन दिन ही याच वर्षी साजरा होतोय, या दोन्ही सुवर्णयोगांचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन श्रीरत्न हॉस्पिटल कराड येथे करण्यात आले आहे. यामध्ये
दि. 8 व 9 ऑगस्ट 2022 रोजी
एलर्जी अस्थमा..
दि. 10 व 11ऑगस्ट हृदयरोग..
दि.12 व 13 ऑगस्ट मेंदू विकार
दि.14 व 15 ऑगस्ट मधुमेह या रोगांचे रुग्ण मोफत शिबिराच्या माध्यमातून तपासले जाणार असून एकूण सात दिवसांचे असे हे मोफत शिबिर आयोजित केले आहे.
त्याचबरोबर आरोग्य विषयीची संपूर्ण माहिती ही दिली जाणार असून या शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे..
या शिबिरात मोफत तपासणी बरोबरच मोफत मार्गदर्शनही केले जाईल. काही महागड्या तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जातील. रुग्णांना गरजेनुसार मोफत औषधी दिली जातील.
त्यामुळे कराड व आसपासच्या रुग्णांनी या सात दिवसीय मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संजय पवार यांनी केले आहे.





















