नगरसेवक रुपेश मोरे ठरलेत दहिवडीकरांच्या नजरेत हिरो
दहिवडी : ता.०७
राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक आणि दहिवडी नगरपंचायत मधील भाजपप्राणित विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांनी स्वतःच स्वछ दहिवडीसाठी गुरुवारी सकाळी घंटागाडी हातात घेतल्याने नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. नगरपंचायत प्रशासन आणि कर्मचारी झोपा काढत आहेत का? असा सवाल नगरसेवक रुपेश मोरेंच्या यांनी केलेल्या कामामुळे दहिवडीकर दबक्या आवाजात चर्चेदरम्यान विचारू लागले आहेत.
नादुरुस्त घंटागाडी गेल्या अनेक दिवसापासून नगरपंचायत इमारतीच्या पाठीमागे उभ्या आहेत. ठेकेदाराला नगरपंचायतीने बिल अदा करूनदेखील घंटागाड्या अद्यापही नादुरुस्त आहेत. याकामी मुख्याधिकारी यांनी दुर्लक्षाची भूमिका घेतल्यानेच नगरसेवकाला स्वच्छतेसाठी घंटागाडी हाती घ्यावी लागल्याची चर्चा आज दहिवडीभर रंगली होती.
नादुरुस्त घंटागाडी दुरुस्त करत त्यात स्वतः डिझेल टाकून दहिवडीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारे नगरसेवक रुपेश मोरे आज दहिवडीकरांच्या नजरेत हिरो बनले आहेत. मात्र नगरपंचायतीचे कर्मचारी पगार घेऊन झोपा काढत आहेत का? मुख्याधिकाऱ्यांचं नगरपंचायतीच्या कामावर लक्ष नाही का? असे अनेक सवाल दहिवडीकर उपस्थित करू लागल्याने स्वच्छतेबाबत दहिवडी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतेच्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जाणार? गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या घंटागाड्या थांबून राहिल्याने दहिवडीत साचलेला कचरा डेपोत पोहचणार का? नगरसेवक रुपेश मोरेंनी घालून दिलेला आदर्श दहिवडी नगरपंचायत जपणार का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया :
राष्ट्रवादीप्रणित पॅनेलची सत्ता असणाऱ्या दहिवडी नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळेच विरोधात असतानाही आम्हाला लोकांची सेवा करावी वाटते. मात्र राष्ट्रवादीच्या लोकांना याच काही घेणं देणं पडलेलं नसल्याने मला ही भूमिका वठवावी लागली.
—- नगरसेवक रुपेश मोरे,दहिवडी नगरपंचायत



















