ओझर्डे गावासह वाई तालुक्यात खळबळ
वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या ओझर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच केशव ऊर्फ पिंट्या भगवानराव पिसाळ यांच्या वर सरपंचासह १४ ग्राम पंचायत सदस्यांनी वाईचे तहसीलदार रंजित भोसले यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केल्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे .ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना कुठल्याही सदस्याला विश्वासात घेत नाहीत असा आरोप सर्व सदस्यांनी केला आहे त्याच बरोबर त्यांना उपसरपंच हे पद सर्वानुमते दोन वर्षा साठी दिले होते . त्याची मुदत संपली असताना देखील स्वेच्छेने त्यांनी राजीनामा देणे गरजेचे होते पण तसे न घडल्याने त्यांची समजुत काढण्यासाठी सर्व पक्षीय गाव कारभार्यानी अनेक बैठका घेऊन त्यांची समजुत काढण्यासाठी प्रयत्न झाले पण ते निशफळ ठरले . त्यांनी सर्वांचा विश्वास घात केल्याने सरपंचासह सर्व सदस्यांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे .अखेर अशा विश्वास घातकी ऊपसरपंचाला धडा शिकविण्यासाठी सरपंच आनंदराव जाधव सदस्य डॉ.विकास पिसाळ ,शेखर फरांदे ,चंद्रकांत रिठे ,सुरेखा क्षीरसागर ,शुभांगी पिसाळ ,अनिता जायगुडे सुनीता पवार ,हर्षदा निता फाटक ,सुनंदा शिंदे ,रेखा कदम डॉ. सत्यजित नेमाडे, अतुल कदम या १४ जणांनी एकत्र येऊन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांचे कडे अविश्वास ठराव दाखल केला आहे .तहसीलदार रणजित भोसले भोसले यांनी हा अविश्वास ठराव दाखल करुन घेतला आहे . त्या वर मतदान घेण्यासाठी २० फेब्रुवारी हि दिनांक निश्चित करण्यात आली आहे .या तारखेला सरपंच व सदस्यांनी दुपारी चार वाजता उपस्थित राहण्या साठी नोटीसा बजावल्या आहेत .






















