सातारा
वाढे गावच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर मोहन नलावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पठाण यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडीचा कार्यक्रम पार पडला.वाढे ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. निवड कार्यक्रमामध्ये हैबतबापू नलावडे म्हणाले वाढे गाव हे शहरालगत असल्यामुळे या गावांमध्ये सोई सुविधांवरती भर देणे गरजेचे असून सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे निवडीबद्दल बोलताना म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कटीबद्ध असून वाढे गावाला विकासाचे रोल मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे मत व्यक्त केले.
यावेळी सरपंच संदेश देखणे, ग्रा.सदस्य वनिता नलावडे, पुनम नलावडे, यशवंत पुजारी, मनीषा नलावडे,विजय नलावडे, मेघा नलावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक हिंदुराव पाटील, मानसिंग नलावडे, संजय नलावडे (माजी चेअरमन), दत्तराज नलावडे (सर),भाजपा तालुकाध्यक्ष निलेश नलावडे, सुबे संघटना जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे, युवराज नलावडे (नाना), सुनील नलावडे, इंद्रजित नलावडे, प्रशांत नलावडे, भरत नलावडे, राजेंद्र नलावडे, मोहनराव नलावडे, अतुल नलावडे, किशोर नलावडे (सर), मनोज नलावडे, साहिल पिसाळ, सागर नलावडे, जितेंद्र नलावडे, अतुल नलावडे, मनोज नलावडे, धीरज नलावडे, राजू जाधव, कुलदीप नलावडे, गणेश नलावडे, मोहित नलावडे, गणपत नलावडे कपिल नलावडे प्रतीक नलावडे अनिकेत नलावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ नलावडे ग्रामसेवक नाळे, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडी बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.