डंपरच्या धडकेने चालू विद्युत प्रवाहसह सिमेंट पोल रस्त्यावर आडवा
पाटण:- नवीन प्रशासकीय (तहसिल कार्यालय) इमारतीच्या बांधकामासाठी काँक्रीट घेऊन निघालेल्या डंपरला विक्रमनगर (पाटण) येथे महावितरणच्या पोलवरील अतिरिक्त महानेटच्या केबल अडकल्याने महावितरणचा चालू विजप्रवाह असलेला सिमेंट पोल केबलसह रस्त्यावर आढवा झाला. सुदैवाने या आपघाताने कोणत्याही प्रकारची हानी झाली नसलीतरी महावितरणच्या पोलवर महानेटच्या केबल अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. या केबलमुळे अनेक ठिकाणी आपघाताची मालिका सुरु झाली आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा जनतेचा जीव टांगणीला लावून सुस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
याचा प्रत्यय विक्रमनगर पाटण येथे प्रत्यक्ष शनिवारी दुपारच्या सुमारास आला आसताना आपघात छोटा दिसत असलातरी या आपघाताचे गांभीर्य मोठे आहे. महावितरणच्या विजप्रवाह पोलवर महानेटच्या अतिरिक्त केबल जोडून रस्त्यापासून पोलवरील केबलची उंची कमी अंतरावर झाल्यामुळे या महानेटच्या केबल आपघाताला आमंत्रण ठरत आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या या ढीसाळ कामामुळे व अशा वारंवार होणाऱ्या अपघातामुळे कोणाचातरी जीव जाऊ शकतो याचे गांभीर्यच प्रशासकीय यंत्रणेने घेतलेले नाही. डिजिटल क्रांती झाली पाहिजे पण ती लोकांचा जीव धोक्यात घालून नको. अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत.
महावितरणच्या पोलवर चाललेल्या महानेटच्या कारभाराबाबत प्रसिद्धी माध्यमांनी अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र लोकहितार्थ असणाऱ्या या बातम्यांच्याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळेच महानेटच्या केबलमुळे आपघाताचे सत्र सुरू झाले आहे अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.






















