ब्रेकिंग न्युज……
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : संतोष सुतार
आज दि 22 जून रोजी वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख त्यांना गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की, एका चार चाकी गाडीतून अवैध विदेशी दारूची वाहतूक दहिवडी कडून वडूज कडे होणार असल्याची माहिती मिळाली. सपोनि देशमुख यांनी तात्काळ एक पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. सदर पथकाने वडूज दहिवडी रस्त्यावरील काळे वस्ती चे सापळा रचला असता एक चार चाकी गाडी आल्याची दिसली. गाडी थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये सात विदेशी दारूचे बॉक्स सापडले. सात बॉक्सची किंमत चाळीस हजार तीनशे वीस रुपये व तीन लाख रुपयाची क्विड गाडी असा एकूण तीन लाख चाळीस हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालक रवींद्र शिवाजी संकपाळ (वय 32 रा रहिमतपूर ता कोरेगाव) याला ताब्यात घेण्यात आले व महाराष्ट्र दारूबंदी कायम कलम 65 क ड ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईमध्ये पो ह ओंबासे, अण्णा मारेकर, संदीप शेंडगे, भूषण माने, संतोष काळे, दीपक देवकर यांनी सहभाग घेतला आहे.