संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांना मिळणारा प्रतिसाद बघून प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 2010 सालच्या ऐतिहासिक मनोमिलना विरोधात संस्थापक पॅनलने अनपेक्षितरीत्या ऐतिहासिक विजय संपादन करुन नवी वाट मळली. पॅनल प्रमुख अविनाश मोहिते यांनी कारखान्याचा कारभार हातात घेऊन तो चांगल्या प्रकारे चालवून दाखवला. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळवून दिला, निष्क्रिय सभासदांना क्रियाशील करुन मतदानाचा हक्क मिळवून दिला. कारखाना आणि सभासदांच्या हिताची बरीच कामे केली.
हे असच चालू राहिलं तर आपली मक्तेदारी संपुष्टात येईल याची प्रतिस्पर्ध्यांनी धास्ती घेतली म्हणून दरम्यानच्या काळात चेअरमन असलेल्या अविनाश मोहिते यांच्या विरोधात खोटेनाटे आरोप करुन सभासदांची दिशाभूल चालू केली, सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. 2015 च्या निवडणूकीत सभासदांची दिशाभूल करुन, प्रशासकीय अफरातफरी करुन विरोधकांनी सत्ता मिळवली पण कारखाना म्हणजे आपली जहागिरी समजणारां कडून सभासदांची मात्र पुन्हा वाताहत झाली. फुकट साखरे आणि सॅनिटायझरच गाजर दाखवून ऊसाला मात्र FRP पेक्षा कमी दर देऊन सभासदांचा विश्वासघात केला.
सत्तेचा असताना ज्या अविनाश मोहिते यांनी विरोधकांना स्टेजवर घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची संस्कृती जपली होती त्याच अविनाश मोहिते यांना 2015 साली सत्तेत आल्यावर त्यांना काय वागणूक दिली, कुठल्या थराला जाऊन त्रास दिला हे जनतेला सांगायची गरज नाही. नीच पणाची पातळी गाठलेल्या राजकारणात अविनाश मोहिते हे नाव संपणार आणि पुन्हा कधी आपल्या मक्तेदारी आड येणार नाही याची सत्ताधाऱ्यांनी दिवास्वप्न रंगवली.
पण हा सगळा त्रास पचवून, षडयंत्रांचे घाव झेलून खचून न जाता अविनाश मोहिते नावाच वादळ पुन्हा सक्रिय झालं. सत्ते बाहेर असताना सुद्धा सभासदांच्या संपर्कात राहिले, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहिले म्हणूनच कृष्णा कारखान्याच्या सभासदांना हा आपला माणूस वाटतो, सभासदांचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत म्हणूनच आज गावोगावी संस्थापक पॅनलला भरभरून प्रतिसाद मिळतोय.
अविनाश मोहिते हा सच्चा माणूस आहे म्हणूनच राज्याचे नेते पवार साहेब, जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचे दिग्गज नेते आज खंबीरपणे अविनाश मोहिते यांच्या पाठीशी उभे आहेत. सत्ताधाऱ्यांचा बॅनर वरुन त्यांच्या नेते मंडळींचे फोटो गायब आहेत, यावरून कुठं पाणी मुरतंय याचं त्यांनी आत्मचिंतन कराव.
कोणी कितीही खोटेनाटे आरोप केले तरी सभासद त्याला बळी पडणार नाहीत, कृष्णा कारखान्याची निवडणूक संस्थापक पॅनलच जिंकणार याची सभासदांना खात्री आहे.