दि.१ व २ मे २०२२ रोजी संपन्न होणार आहे.या शुभप्रसंगी दि.२६ एप्रिल पासून युवासंस्कार शीबीराचे आयोजन करण्यात आले आहे.महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांची समाजाला नव्याने ओळख करुन देण्यासाठी तरडगाव येथे १९९३ रोजी श्रीब्रह्मविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम संस्थेची स्थापना झाली. कै.परमपूज्य महंत श्री जुन्नरकरबाबाबा यांनी आश्रम संस्थेची स्थापना केली.आश्रमाचे संचालक आचार्यप्रवर महंत गुरुवर्य श्रीराहेरकरबाबा यांनी उत्तम पध्दतीने आश्रमाची वाटचाल सुरू ठेवली आहे. लहान बालकांपासून ते वृध्दांपर्यत २०० साधकांचा शिष्य परिवार आश्रमात वास्तव्यास आहे. व्यसनमुक्त सदाचारी व मुल्याधिष्टित समाज घडविणे.समाजप्रबोधन,संस्कार शिबीर,व्याख्यानमाला,योगप्रशिक्षण आदि उपक्रम आश्रम संस्था वर्षभर आयोजन करीत असते.श्रीब्रह्मविद्या शास्राच्या माध्यमातून समतेचा, ममतेचा,जिव्हाळ्याचा संदेश समाजाला सांगून सामाजिक संजीवनी देऊन समाजाहितसह पंथहितासाठी कार्यरत आहे.

आश्रम संस्थेमध्ये गुरुकुल पध्दतीने पहाटे ४ पासून ते रात्री १० वाजेपर्यंत सामुदायिक धार्मिक विधी व अखंड ज्ञानसाधना नामस्मरण साधना चालू असते.तरडगाव पंचक्रोशीत श्रीकृष्ण मंदीर हे भाविक भक्तांचे आराध्य दैवत मानले जाते.१ मे व २ मे रोजी मोठ्या उत्साहाने वार्षिक कार्यक्रम व वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून भाविक भक्तांनी व पंथीय अनुयायींनी धार्मिक कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे अवाहन परमपूज्य आचार्य महंत गुरुवर्य श्रीराहेरकरबाबा यांनी केले आहे.
संस्कार शिबीरासाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी सहभागी होणार असून वर्धापनदिनी अध्यात्मिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच पंथातील संत,महंत,आचार्य,महिला साध्वी उपस्थित राहणार आहेत.रविवार.१ मे सकाळी ७ वा.गावातून पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल..सोमवार २ मे रोजी सकाळी ६ वा.धार्मिक सभा संपन्न होणार आहे.अशी माहिती श्रीब्रह्मविद्या पाठशाळा संस्थेचे प्रतिनिधी पू.श्री युगंधर राहेरकर यांनी प्रसार माध्यमाकडे दिली आहे.कार्यक्रमाचे आयोजन श्रीब्रह्मविद्या पाठशाळा संस्था तरडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे






















