नवारस्ता प्रतिनिधी : पाटण मधील रामपूर येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते इरफान सातारकर यांची शिव अल्पसंख्यांक सेनेच्या पाटण तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. आमदार शंभूराज देसाई व शिव अल्पसंख्याक सेनेचे महाराष्ट्र राज्य उप प्रमुख मेहबूब भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळेला शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, शिवदौलत बॅंकेचे संचालक अभिजीत पाटील, संजय गांधी निराथार योजना समिती चे अध्यक्ष भरत साळुंखे, पाटण नगरपंचायत नगरसेविका सौ. आस्माँ सादिक इनामदार व सौ. शैलजा मिलींद पाटील , जि.प. सदस्य विजय पवार, सौ. सुगरा बशीर खोंदू , पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर , पाटण तालुका ओबीसी अध्यक्ष इकबाल भाई सय्यद, माजी जि. प. सदस्य बशीर भाई खोंदू , माजी नगरपंचायत सदस्य गणिभाई चाफेकर, सलीमभाई इनामदार, इब्राहीम भाई सातारकर, नईम खतीब, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इरफान सातारकर म्हणाले की, संघटनेने व ना. शंभूराज देसाई साहेब यांनी दिलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडू व अल्पसंख्यक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू.
युवा नेते यशराज देसाई , रविराज देसाई , आजि -माजी पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.