महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :यशवंतनगर (ता. कराड) राष्ट्रीय स्तरावर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन यांचे मार्फत घेण्यात आलेल्या बँकिंग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेच्या निकालामध्ये सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५ माजी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले. यामध्ये कु. ऐश्वर्या सुधीर शिंदे व कु. गौरी शंकर डफळ या विद्यार्थीनींची इंडियन बँकमध्ये अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर या पदावर निवड झाली. तसेच कु. प्राजक्ता सुभाष लाड, कु. सुप्रिया गणपत जंगले आणि स्वप्निल संदीप नेवसे या विद्यार्थ्यांची इंडियन बँकमध्ये ज्युनिअर असोशिएट या पदावर निवड झाली. या यशाबद्दल महाराष्ट्राचे सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सह्याद्री कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक- अध्यक्ष मा. नामदार श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी गायकवाड, मा. जशराज पाटील (बाबा) व सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक श्री. आबासाहेब पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.