वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथील ८८ वर्षे पूर्ण होऊन ८९ वर्षात पदार्पण करीत असणाऱ्या ऐतिहासिक शा दुर्गा खानावळ येथे महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाठार स्टेशन ( ता.कोरेगाव) या गावामध्ये १९३४ मध्ये सोनूबाई जाधव यांनी सुरु केलेली दुर्गा खानावळ आजही त्यांच्या सुना नातसुना यांनी सुरू ठेवली आहे . गेली ८८ वर्षे अखंडितपणे जाधव कुटुंबातील महिलांनी खानावळ व्यवसायात वेगळा ठसा उमटवलेला आहे . दुर्गाखानावळीच्या वाटचालीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.गेल्या १६ वर्षापासून विमलताई आणि दुर्गाताई ८ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनास एक हजार महिलांना मोफत जेवण देतात . अंध , अंपग पुरुष महिलांना खानावळीच्या जेवण दरात ५० टक्के सूट दिली जाते.
दुर्गा खानावळ वाठार येथे साजऱ्या करण्यात आलेल्या महिला दिनाचे उद्घाटन सातारा जिल्हा फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर सौ जयश्री सौंदती मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवर आणि पाहुण्यांचे स्वागत सौ.दुर्गा जाधव,सौ शामल जाधव,सौ प्रतीक्षा जाधव यांनी केले.या कार्यक्रमात सातारारोड येथील भजनी मंडळाचा भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या भजनी मंडळाने कार्यक्रमाला संगीतमय साज दिली.या कार्यक्रमास हजर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी,सरकारी दवाखान्यातील महिला कर्मचारी,तसेच विटभट्टी तसेच शेती आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अश्या महिलांना मोफत जेवणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ११०० महिलांना मोफत जेवण देण्यात आले.या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची,फुगडी,चमचा लिंबू आणि अनेक पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खानावळीच्या संचालकामार्फत महिला दिनी ज्या महिलांचा वाढदिवस असतो त्या महिलांना साडीचोळी आणि एक विशेष भेट वस्तू देऊन त्यांचा वाढदिवस या खानावळीत साजरा करून करण्यात येतो.या कार्यक्रमात संतकृपा डेअरीच्या चेअरमन यांच्या वतीने सर्व महिलांना मसाला ताकाचे वाटप सुद्धा करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ.रजनी गंगावणे यांनी केले आणि आभार सौ दुर्गा जाधव यांनी मानले