या दौऱ्यांचे औचित्य साधून नागठाणे सातारा- नागठाणे उंब्रज काळी पिवळी वडाप संघटनेच्या वतीने व सातारा , सांगली, जिल्ह्याच्या वतीने नामदार साहेबांना निवेदन देण्यात आले. गेले चार महिने बंद असलेल्या वडाप वाहतूकीमुळे त्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाच्या वतीने काही तरी सुविधा उपलब्ध व्हावी व लवकरात लवकर वडाप वाहतूक सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत या साठी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा,नामदार साहेबांना निवेदन दिले ,हे निवेदन देताना कराड उत्तर तालुका उपप्रमुख श्री.शंकर जगन्नाथ साळुंखे, वर्धन अॅग्रोचे संचालक श्री. अविनाश साळुंखे , नागठाणे ग्रा.प सदस्य श्री.संतोष साळुंखे पाटील, माजगाव गावचे सुपुत्र श्री.बबलू शेठ ,श्री.बाळू मिस्त्री,तारळेगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री आभिजीत पाटील ( काका) आणि ग्रामस्थ उपस्थित होते