महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर )
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थी आहे त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून घारगाव येथील साईकृपा कृषी महाविद्यालयचा विद्यार्थी प्रणील साहेबराव रणवरे यांनी निमसाखर ( ता. इंदापूर ) येथे शेतकरी वर्गास एकात्मिक तण नियंत्रण, बिज प्रक्रिया, किड आणि रोग व्यवस्थापन मध्ये बोर्डो मिश्रण तयार करणे, चिकट सापळे, कामगंध सापळ्यांचा वापर करणे,
तसेच जैविक शेतीमध्ये ५ % निंबोळी अर्क तयार करणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. के.एच.निंबाळकर, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए.बी.जाधव व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम.लोंढे, सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.






























