कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा गावा – गावांत शिरकाव होऊ लागला आहे , असे चित्र सध्या दिसत असून , आज उद्धट मध्ये नव्याने कोरोनाचा रूग्ण आढळला आहे . पुणे जिल्हा बॅंकेच्या अधिकारी यांस लागण झाली आहे .
इंदापूर शहरासह तालुक्यातील शिरसोडी , पोंदकुलवाडी, गणेशवाडी , भिगवण , लाकडी , बोरी , जंक्शन , कळंब ( लालपुरी ) या गावात कोरोनाची लागण झालेनंतर आज उद्धट मध्ये कोरोनाचा नवीन रूग्ण आढळला आहे . पुणे जिल्हा बॅंकेच्या अधिकारी यांस कोरोनाचीा लागण झाली आहे. हे अधिकारी नेमणूकीस पुणे येथे असतात , परंतु ते सध्या येथे मुक्कामी होते . त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे . प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी परिसरातील काही गांवे बफर झोन म्हणून निश्चित केली आहेत , त्यामुळे या भागात सध्या दैन॔दिन व्यवहार बंद आहेत.