का-हाटी प्रतिनिधी बाळासाहेब वाबळे
काऱ्हाटी – मोरगाव (ता. बारामती) येथील सुपे मोरगाव रस्त्यावरील भोंडवे वाडी नजिक टँकरमधून स्पिरिट चोरी करून विक्री करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुपे मोरगाव रोडवर धोंडेवाडी गावचे हद्दीमध्ये राजस्थानी रंगीला ढाबा असून त्याच्या आवारामध्ये हा भयंकर प्रकार सुरू होता सोळा चाकी टँकर ने स्पिरीट दुसऱ्या राज्यात जात असताना हे स्पिरीट घेऊन जाणारा ट्रक चालक सुखनाम सिंग हा राजस्थानी धाबा चालवणाऱ्या पुखराज भारगवला हे स्पिरीट विकत असे. हा ढाबा चालक हे स्पिरीट दारू वाल्यांना विक्री करत असल्याची माहिती समोर आली. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे विभागीय भरारी उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी केली.