सातारा / चंद्रकांत पवार : खरतर पोलीस हेडकॉटर सातारा येथे कार्यरत असणारे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्याबरोबर भेटण्याचा योग आला कारण होतं सातारा पोलीससाठी नव्याने उभारलेले सागरिका कॅन्टींग पहिला कोणताही परिचय नसताना कर्तव्यनिष्ठ व तितकाच शिस्तबद्ध अशा व्यक्तिमत्त्वाचा अनुभव पहिल्यांदा मिळाला साहेबानी त्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन स्वतः सागरिका कँटीनमध्ये जाऊन फिरून सर्व माहिती दिली अशा हरहुन्नरी व्यक्तीमत्वा बरोबर माझा पहिला अनुभव, त्यानंतर सातारा पोलिसांची साधारण 40 एकर क्षेत्रामध्ये फायरिंग रेंज मध्ये असलेल्या जागेमध्ये वनराई फुलवायचं काम सुरू झालं तसा स्वतः निसर्गात रमणारा निसर्गप्रेमी असल्यामुळे त्या कामाला स्वतःच वाहून घेऊन त्यातील बारकावे व त्यामध्ये स्वच्छता ठेवणे ,गवत काढणे ,पाणी मिळते की नाही ते पाहणे या अशा लहान सहान कामसुधा स्वतः न चुकता लक्ष देत असतात. सातारा पोलीस दलाचा साधारण 40 एकर वनराई आज जोमानं उभी आहे. मधल्या काही काळामध्ये वनवा लागण्याच्या घटना घडत होत्या त्याला स्वतः लीड घेत आपल्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन रात्री-अपरात्री डोंगरदऱ्यात जाऊन वनवा विजवण्याचे काम स्वतः व आपल्या कर्मचार्यांना बरोबर घेऊन केल्याच्या अनुभव माझ्या समोरील आहे. जितका निसर्गप्रेमी तितकच शिस्तबद्ध व शांत स्वभावाचे राजेंद्र साळुंखे.
बरेच वेळा शासनाच्या वेगवेगळ्या अध्यादेश (Gr)चे उकलन होताना कायद्याची भाषा समजण्यासाठी मार्गदर्शन नेहमीच लाभायचं या वयात सुद्धा शासकीय कायदे, व कायद्यातील बारकावे यातील असंख्य ज्ञान जोपासणारे व परिपूर्ण माहिती असणारे व सतत कायद्याचा अभ्यास करणारे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे मला भावले. अशा हरहुन्नरी निसर्गप्रेमी ,शिस्तबद्ध मायाळू स्वभावाचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे यांचा सातारा पोलीस दलात उल्लेख नेहमीच होत राहील.
वृक्ष वली आम्हा सखे सोयरे, या ओवीतील उक्ती प्रमाणे पोलीस उपआधीक्षक (ग्रह) राजेंद्र सळूखे यांनी सरकारी बंगल्या लगत पडीक जमिनीत बनवली सप्ततारा आबराई विविध फळझाडे,फळभाज्या,पालेभाज्या,वेलवर्गीय भाज्या याची लागवड करत संपूर्ण परिसरच निसर्गरम्य करून टाकला आहे. या निसर्ग प्रेमी आधीकार्याला सलाम
आपण शासकीय सेवा बजावत असताना सुद्दा निसर्गाची सोयरीक करत आपल्या अंगणात स्वता वनराईलाच फुलवल्याच साताऱ्यातील बहुदा हे पहिले उदाहरण आसव आपण आपली सेवा बजवून काही दिवसांनी हा परिसर बंगला सोडून जाणार हे माहीत असताना पण आपल्या आवडीला जोपासणारा अवलिया म्हणावे लागेल. साहेब आपण गेलात तरी आपली वनराई आपली आठवण काढल्या शिवाय राहणार नाही रोज सकाळी चिव चिवणारी पाखरे आपल्याला बगतल्याशिवाय राहणार नाहीत कोण जाणे किती काळ आपण फुलवलेली अंगणातील वनराई वनराईत पशु ,पक्षी आपल्या आठवणीने व्याकुळ हितील हा काळच ठरवेल.