कळंब प्रतिनिधी
जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने व जनावरे वाहतुक करण्याचा कोणताही परवाना नसताना पिकअप गाडीतून जर्सी गायींची वाहतुक करणारा वाहन चालक व क्लिलर , वाहनासह चार गायी इंदापूर पोलीसांनी मौजे शहापाटी गावच्या हद्दीत पकडल्या असून त्यांना ताब्यात घेवून , त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलीसांकडून देण्यात आली आहे .हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल लोंढे यांचे पथकाने केली आहे.
स्थानिक नागरिकांनी इंदापूर शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे.































