कळंब/प्रतिनिधी/शहाजीराजे भोसले :
अनेकांना कोरोना वाॅरिअर्स , कोरोना योद्धा किंवा कोरोना मर्दानी असे प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात येत आहे . प्रमाणपत्र मिळाल्याने खुष झालेले अनेक योद्धे सोशल मिडियावर झळकत आहेत . परंतु या प्रमाणपत्रास कोणतीही शासकीय वैधानिकता नाही .
अनेकांनी हि प्रमाणपत्रे सोशल मिडियावर आनंद व्यक्त करण्यासाठी अपग्रेड केली आहेत , कुटुंबातील व्यक्ती , मित्र मंडळी , नातेवाईक त्यांचे कौतुक करतात . मात्र अशी प्रमाणपत्र देण्याचे निकष काय आहेत ? त्याविषयी शासकीय पातळीवर भुमिका जाहीर केलेली नाही .
सध्या सामाजिक संस्थाकडून कोरोना योद्धे , कोरोना मर्दानी असे प्रमाणपत्र दिले जाते , त्यातून प्रत्यक्षात काम करणारे व प्रसिध्दी पासून दूर राहिलेल्यांचे अवमूल्यन होवू शकते . यामुळे अशा प्रमाणपत्रांची काहीच वैधानिकता नाही असे पुणे येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे विश्वस्त अॅड . शिवराज कदम – जहागीरदार यांनी सांगितले .