जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामतीत आज नऊ जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील ०७ तर नवीन २ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन रुग्णा पैकी रुई येथील एक (पुरुष २५ वर्षे) व गुणवडी चौक परिसर मधील एक महिला (२३ वर्षे )आहे. वसंतनगर येथील यापूर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी चार एकाच कुटुंबातील तर एक पुरुष (वय ३१ वर्षे )व ३ स्रीया (वय ४४, २७, ०४ वर्षे) आहेत.इतर एक पुरुष (वय ३२ वर्षे) व एक स्री( १६ वर्षे ) व जेबीएम टाउनशिप मधील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती (वय ३५ वर्षे पुरुष) पॉझिटिव्ह आलेला आहे.
दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की,अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे.मास्कचा वापर करावा, सामाजिक आंतर पाळावे व वारंवार हातधुणे व सनिटायझरचा वापर करावा.या परिसरामध्ये आरोग्य कर्मचारी मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.त्यांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.