महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामती येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ, गेल्या दोन दिवसापासून रस्त्याच्या कडेला एका अनोळखी अनाथ, व्यक्तीस काही तरुणांनी कसलिही तमा न बाळगता, मोठ्या धाडसाने वैद्यकीय मदत मिळवून देऊन, पुढील उपचारासाठी बारामतीच्या सरकारी रुग्णालयात, दाखल करुण वाचवला अनाथ व्यक्तीचा जिव.
दि.११ रोजी गेल्या दोन दिवसांपासून, सिद्धेश्वर गल्लीत श्री स्वामी समर्थ मठा जवळ, एक अनाथ वयक्ति रस्त्याच्या कडेला पडलेली होती.सदर व्यक्तीस कोणीही अन्न व पाणी, देण्यास तयार नव्हते. तेथुन येणारे जाणारे अनेक नागरिक, सदर व्यक्तिस पाहून तळमळ, व्यक्त करीत होते. परंतु धाडस करूण कोणीही, पुढे होऊन मदत करण्यास तयार नव्हते, ही बाब बारामती मधील काही, सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास, येताच त्यांनी क्षणाचाही विलंब, न लावता या सामाजिक कार्य, करणाऱ्या तरुणांनी शासकीय हेल्प लाईन, क्रमांक १०८ या दूरध्वनी क्रमांकावर, फोन करून भिगवण, येथून अँम्बूलंस बोलावली.
सद्य परिस्थितीचे गंभीरता पाहून, डॉ.राजन सोनवणे व चालक गजानन शेलार, यांची कठीण परीक्षा होती, ती सदर व्यक्तीस अँम्बुलंस, मध्ये ठेवायचे कसे, सदर व्यक्ती एका जागेवर पडून, असल्याने त्याचे अंगातून, दुर्गंधी सुटली होती.परंतु त्याची कसलिही, तमा न बाळगता दैनिक लोकमतचे, पत्रकार अमोल यादव,अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे, अध्यक्ष श्रीकांत जाधव, राहुल जाधव, मयूर जाधव, विकास चौधरी, हनुमंत गायकवाड, भारत दळवी, अमित परदेशी, प्रदीप आचार्य, यांनी मोठ्या धाडसाने सँनिटायझरचा, व हॅंडग्लोजचा मोठ्या प्रमाणात वापर करुण, सदर व्यक्तीस अलगद उचलून, अँम्बूलंस मध्ये ठेऊन बारामतीच्या, सरकारी दवाखण्यात नेहुन अँडमीट केले. व सदर व्यक्तीचे प्राण वाचवले.
बारामती शहरातील सिद्धेश्वर गल्ली येथून अनाथ व्यक्तीस अँम्बूलंस मध्ये ठेवत असताना तरुण कार्यकर्ते






















