फलटण : आज दिगंबर आगवणे यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रकार केला असल्याचे समजले. वास्तविक आगवणे यांचा आजचा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केलय.
शहा म्हणाले, आज दिगंबर आगवणे यांनी पोलीस ठाण्यात आत्महत्या केली. खरतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना किंवा डॉक्टरांना सांगितल्यानंतर ते २४ तास देखरेखीखाली रुग्णाला ठेवतात. पोलीस ठाण्याची हवा सहन न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील या पळवाटीचा आधार घेत आगवणे यांनी आजचा तमाशा मांडला आहे.
आज या तमाशात त्यांच्या मुलाची म्हणजेच तुषार याची देखील एंट्री झाली आहे. तुषार हा त्याचा मुलगा नाही, हे जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत आगवणे यांनी स्वतः प्रतिज्ञापत्राद्वारे कळवले होते. आपल्या राजकारणासाठी स्वतःच्या मुलाला देखील आपले न म्हणणाऱ्याने आमचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करणे योग्य नाही. आगामी काळात सहानुभूतीसाठी आमच्या नेत्यांचा म्हणजेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचा उपयोग केल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही, असेही शहा यांनी यावेळी सांगितले.