महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, आता राज्यातील दोन जिल्ह्यांत शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांत जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात येणार असल्यााची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्याचे ओबीसी कल्याण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात येणार आहेत. येत्या ४ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्यात येतील. या जिल्ह्यांत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी नाहीत, सर्व शाळा डिजिटल नाहीत .
विजय वडेट्टीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलं, शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे आणि ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. शिक्षण मंत्र्यांना ४ ऑगस्ट रोजी गडचिरोलीला बोलाविले असून त्या सुद्धा येणार आहेत.