महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :दहिवडी
शिखर शिंगणापूर गावांमध्ये चार महिन्यापासून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे शासनाचा आदेश वसुली करू नये व कर्जदार यांना त्रास देऊ नये, चक्रवाढ व्याजाने पैसे वाढतील ,अशी भीती घालून तुमची रक्कम डबल होईल ,तुमचे आधार कार्ड बाद होईल, पुन्हा तुम्हाला फायनान्स कंपनी कर्ज देणार नाही ,तुम्ही आमचे पैसे भरा , अशी भीती घालून भारत फायनान्स व चैतन्य फायनान्स यांच्या वतीने कर्ज वसुली शिंगणापुर मध्ये केली जात होती
भारत फायनान्स यांच्यावतीने शिखर वस्तीमध्ये महिला बचत गटांना कर्ज दिले होते भारत फायनान्स वतीने एक कर्मचारी सकाळी 11 वाजता एमटीडीसी परिसरामध्ये आला होता सर्व महिलांना एकत्र करून कर्ज भरण्यासाठी सांगत होता त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विरभद्र कावडे सर ऋषिकेश साळुंखे , गोटू पवार, वैभव पवार,पै बापू पवार या सर्वांनी जाऊ बघितले असता त्या ठिकाणी भारत फायनान्स चा कर्मचारी ओंकार जाधव उपस्थित होता त्याची चौकशी केली शासनाने वसुली करू नये हा आदेश आहे तरी तुम्ही वसुली का करत आहे
इथून पुढे जर वसुली साठी आला तर तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल त्यानंतर त्यांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले *कर्जवसुलीसाठी सर्व आदेश आहेत मान्यता आहे , आम्हाला वसुलीचा अधिकार आहे त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांच्यावर गुन्हा दाखलची कारवाई चालू केली त्या ठिकाणी हेडकॉन्स्टेबल भिसे यांनी फोन करून वरिष्ठांशी तुमची सगळी कागदपत्र घेऊन या व जिल्हा बंदी असताना तुम्ही कशासाठी सातारा जिल्ह्यामध्ये आला तुम्हाला कोणी अधिकार दिलेत सांगितल्यानंतर त्यांची त्यांना चूक समजली याकामी राजकुमार भुजबळ साहेब यांना फोन वरून माहिती दिली असता सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे , पत्रकार सचिन पवार सर, केंद्रीय मानवाधिकार समिती उपाध्यक्ष जयकुमार मोरे व भारत फायनान्स प्रतिनिधी ओंकार जाधव या सर्वांना एकत्र बसून भिसे साहेब यांनी समोर चर्चा केली कावडे यांची मागणी होती इथून पुढे शिखर शिंगणापुर मध्ये शासनाचा आदेश येई पर्यंत कोणत्याही फायनान्स वाल्यांनी वसुलीसाठी येता कामा नये.

काही कर्मचारी वसुलीसाठी कर्जदार यांना भेटण्यासाठी येतो म्हणून येत होते व भीती घालत होते तुमचे आधार कार्ड बंद अशी कर्जदार महिलांना भीती घालत होते या सर्व प्रकारामुळे आमची प्रमुख मागणी फायनान्स कंपनी कर्मचारी यांनी शिंगणापुर मध्ये वसुलीला येता कामा नये होती यावर मार्ग काढताना भिसे साहेब यांनी त्यांच्याकडून लिहून घेऊन शासनाचा वसुलीचा आदेश येईपर्यंत शिंगणापुर मध्ये वसुली करता कामा नये असे त्याला समज देण्यात आली व त्याच्याकडून लिहून घेण्यात आले वसुली कर्मचारी ओंकार जाधव यांनी माफी मागितली परत वसुलीसाठी येणार नाही शासनाचा वसुलीचा आदेश येई पर्यंत शिखर शिंगणापूर मधील कोणत्याही कर्जदारास वसुलीचा त्रास देणार नाही हे मान्य केल्यानंतर त्याला लेखी जबाब व समज देऊन या वादावर तोडगा काढून पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ साहेब व पोलीस कॉन्स्टेबल भिसे साहेब यांनी योग्य मार्ग काढला .






















