कार्यक्रमासाठी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे यांची प्रमुख उपस्थिती
नागठाणे :-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वतीने इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संतोष घाडगे (दादा),सरपंच सौ.शुभांगी संतोष घाडगे, उपसरपंच श्री.राजेंद्र घाडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन लोखंडे यांच्या शुभहस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी श्री संतोष घाडगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच श्री. बावकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमास कामेरी गावचे ग्रामस्थ श्री.दत्तात्रय घाडगे, मुख्याध्यापक श्री. प्रमोद बावकर,पदवीधर शिक्षिका सौ. भारती यादव व शिक्षिका श्री तबसून खान, श्री.धनाजी कातांगळे ,रेश्मा घाडगे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.