लोणंद पोलीसात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल,
नराधम शिक्षकास पोलीसांकडून तात्काळ अटक
लोणंद/प्रतिनिधी
लोणंद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मधील कंत्राटी शिक्षकाने विद्यार्थी असणाऱ्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार केल्या प्रकरणी लोणंद पोलीसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी विकास तानाजी बोडरे वय ३२ मूळ रा विठ्ठलापूर ता आटपाडी जि सांगली हल्ली रा बाजारतळ लोणंद यास लोणंद पोलीसानी अटक केली आहे.
या प्रकाराबाबत लोणंद पोलीस स्टेशन ठाण्यातून मिळालेली आधिक माहिती अशी की, लोणंद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशन ट्रेडला कंत्राटी शिक्षक असणाऱ्या विकास तानाजी बोडरे वय ३२ मुळ रा विठ्ठलापूर ता आटपाडी, जि सांगली, हल्ली रा बाजारतळ लोणंद या शिक्षकाने आपल्या रुमवर अल्पवयीन विद्यार्थ्यास गरिबीचा व असाह्यतेचा फायदा घेत मार्क कमी करण्याची तसेच गैरहजेरी लावून कॉलेज मधून काढून टाकण्याची धमकी देऊन त्याच्यावर मागील नऊ महिन्यांत जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी आयटीआय शिक्षक विकास बोडरे याच्यावर लोणंद पोलीसात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन लोणंद पोलीसांनी या शिक्षकास ताताकाळ अटक केली आहे. या घटनेमुळे लोणंद परिसरात खळबळ उडाली असुन या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत .






























