महाराष्ट्र न्यूज वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी संतोष भोसले
स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला बाके देण्यात आली.
लॉकडाउनच्या काळात सर्व घरी असल्याने जुन्या मित्रांची एकमेकांना आठवण झाली आणि शाळेतील त्या… जुन्या आठवणींना उजाळा मिळाला यामधून झालेल्या चर्चेतून आपण शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी काही भेटवस्तू देण्याचे ठरले. दादासाहेब लोणकर, अरविंद खोमणे, अनिल धुमाळ यांनी याबाबत शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गलांडे यांच्याशी चर्चा केली. पाचवीत शिकणाऱ्या मुलांना सध्या बाकांची आवश्यकता आहे असे गलांडे यांनी सांगितले यावरून सन 1984 /85 या कालावधीत दहावीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकाला संपर्क करून सुमारे 28 हजार रुपये किमतीची बाक खरेदी केले. या योगदाना मध्ये सुमारे 31 जणांनी सहकार्य केले. या कालावधीत दहावीत असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांना संपर्क साधून शाळेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. लॉकडाउनमुळे अनेकांशी प्रत्यक्ष संपर्क होऊ शकला नाही परिणामी गावातील ठराविक लोकांनी एकत्र येऊन ही भेट दिली आहे. मुख्याध्यापक गलांडे यांनी माझी शाळा ही संकल्पना माजी विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला परिणामी अनेक दानशूर माजी विद्यार्थ्यांचे हात पुढे आले आणि शाळेला मदतीचा ओघ सुरू झाला या ओघातून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या जातील असे गलांडे यांनी यावेळी सांगितले.