महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
केंद्र सरकारने टिक टॉक, शेअर इट सह 59 ॲपवर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे. सरकारने अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर बंदी घातली आहे.सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने हे पाऊल उचललं आहे. भारत-चीनमध्ये तणाव असताना मोदी सरकारने चीनवर हा एकप्रकारचा मोठा प्रहार केला आहे.
भारत-चीन वादा नंतर भारतातून या अॅपवर बंदी घालण्याची मागणी वाढली होती. चिनी App वर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर देखील जोरदार मागणी होत होती.अखेर काल सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे. आयटी अॅक्टच्या 69 ए नुसार सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यावर बंदी घातली आहे.
सरकारने खालील मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे.
TikTok,Shareit,Kwai,UC Browser,Baidu map,Shein , Clash of Kings, DU battery saver,Helo,Likee,YouCam makeup,Mi Community, CM Browsers,Virus Cleaner, APUS Browser, ROMWE, Club Factory ,Newsdog, Beauty Plus, WeChat ,UC News, QQ Mail, Weibo,, Xender, QQ Music, QQ Newsfeed, Bigo Live, SelfieCity, Mail Master, Parallel Space, Mi Video Call Xiaomi, WeSync, ES File Explorer, Viva Video QU Video Inc, Meitu, Vigo Video ,New Video Status, DU Recorder, Vault- Hide, Cache Cleaner DU App studio, DU Cleaner, DU Browser, Hago Play With New Friends, Cam Scanner, Clean Master Cheetah Mobile, Wonder Camera, Photo Wonder, QQ Player, We Meet, Sweet Selfie, Baidu Translate, Vmate ,QQ International ,QQ Security Center, QQ Launcher, U Video, V fly Status Video,,Mobile Legends






















