पुणे : वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार बेकायदेशीर आरागिरणी ( Saw mills ) जुना मुंढवा रोड, तुकाराम नगर, खराडी, येथे सुरु असल्याचे पुणे वनविभागास समजले. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक, पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ व इतर वनकर्मचारी यांनी बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या आरागिरणी ( Saw mills ) वरती पुणे वनविभागा मार्फत कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या आरागिरणी (Saw mills). अशोक खाशाबा जाधव, (रोहित पॅकेजिंग, तुकाराम नगर,) सुनील भास्कर निकम, (महाराष्ट्र पॅकेजिंग, (पाटील बॉक्स ), तुकारामनगर, खराडी), भावनाजी रावजी पटेल,(लक्ष्मी टिंबर, वाघेश्वरनगर, खराडी) यांचा समावेश होता. सदरील कारवाई मध्ये एकूण ०६ आरा मशिन वनविभागाकडून जप्त करण्यात आल्या.
सदर ची कार्यवाही ही राहुल पाटील, (भा.व.से.), उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली आशुतोष शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक, मयूर बोठे, सहाय्यक वनसंरक्षक, व मुकेश सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे, हनुमंत जाधव ,वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ, तसेच पुणे, शिरोता व पौड वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी व स्थानिक पोलीस प्रशासन यांचे सहकार्याने पार पडली. सदर प्रकरणात भारतीय वनगुन्हा नोंदवून पुढील तपास चालू आहे.