महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपले किल्ले आपली जबाबदारी” हि मोहीम राबवली जात आहे. याची सुरुवात १५ जानेवारी रोजी सातारा येथील अजिंक्यतारा किल्यावरून झाली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कराड येथून शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांच्या सह विस ते बाविस शिवप्रेमी मावळे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
यावेळी काकासाहेब जाधव यांनी पोलीस प्रमुख समीर शेख यांना भेटून कराड मधील वसंतगड, सदाशिवगड, आगाशीवगड व किल्ले मच्छिंद्रगड याठीकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने येणाऱ्या रविवारी २२ तारखेला किल्ले वसंतगड येथे पोलीस कर्मचारी, अधिकारी व नागरीकांच्या सहभागातून हि मोहीम संपन्न होणार आहे. या मोहीमेची सुरूवात सकाळी ७ वाजता तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहीते यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून होणार आहे. गडावर सर्व एकत्र आल्यानंतर ४ तुकड्या करून वेगवेगळ्या भागाची स्वच्छता केली जाईल. त्यानंतर चहापान कार्यक्रम होईल. नंतर वसंतगड किल्ल्याच्या विषयी माहिती सांगितली जाईल शेवटी आभार कार्यक्रम होईल. तरी या मोहिमेत सर्व गडप्रेमी, शिवप्रेमी, तरूण, तरूणी व पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन काकासाहेब जाधव व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे._