महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात देशभर झाल्या मुळे केद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला त्या मुळे नागरिकांना आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवावे लागल्या मुळे अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे त्या मुळे फलटण नगररिषदेने संकलितकर पाणी पट्टी तसेच नगरपालीकेने भाड्याने दिलेल्या गाळ्यांचे भाडे माफ करावे अशी मागणी माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनी निवेदनव्दारे केली आहे
गेली चार ते पाच मैहिणे झाले लॉक डाऊन मुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद आहेत छोटे मोठे कारागीर , हातगाडीवाले, टपरीधारक, भाजी विक्रते , रिक्षा , इतर लहान मोठी वाहतूक करणारे वाहन चालक, तसेच सर्वच क्षेत्रात काम करणारे कारागीर , कामगार यांना याचा मोठा फटका बसला आहे त्या मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे नागरिकांना आपले लाईट बिल तसेच इतर घर खर्चच भागवने अवघड झालेले आहे अनेकांनी बँका पथसंस्था तसेच इतर ठिकाणाहून कर्ज काढलेली आहेत त्यांना हप्ते तसेच त्याचे व्याज भरणे सुद्धा कठीण झाले आहे
फलटण नगरपालीकेचे गाळे भाडे तत्वावर अनेकांनी घेतलेले आहेत ते गाळे लॉकडाऊन मुळे गेल्या चार मैहिण्या पासून बंद आहेत त्या मुळे गाळे धारकांना गाळ्याचे भाडे सुध्दा भरणे कठीण होऊन बसले असल्याचे तुकाराम गायकवाड या निवेदन म्हटले आहे
त्यातच लॉकडाऊन सुरू होण्यापुर्वी फलटण नगरपालीकेने अतिक्रनच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या व्यवसायावर बुलडोजर फिरवला आहे त्या मुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत अनेकांचे मोठ्या प्रमाणात नगरपालीकेच्या अतिक्रण विभागाने जाणीवपूर्वक नुकसान केले असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे
गेली अनेक दिवसापासून सर्व व्यावहार ठप्प झाले असल्याने नागरिकांचे कधी न होणारे नुकसान झाले आहे म्हणून नगरपालीकेने नागरिकांची घरी पट्टी पाणी पट्टी शिक्षणकर ( संकलित कर ) तसेच नगरपालीकेने भाड्याने दिलेल्या गाळ्याचे भाडे माफ करावे त्या साठी फलटण नगरपालीकेने खास सभा घेऊन ठराव करावा व तो जिल्हाअधिकारी यांचेकडे पाठवून मंजूर करून आणावा अशी मागणी तुकाराम गायकवाड यांनी केली आहे