महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
काँग्रेस सुरुवातीपासून देशातील शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली अनेक बंधनांमध्ये अडकवून ठेवत आली आहे आजपर्यंत काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांच्या हिंताला जपणारा कोणताही निर्णय घेतला नाही आणि आज जेव्हा मोदी सरकार शेतीविषयी कायद्यामध्ये सुधारणा करून भारतीय कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणून बळीराजाची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत आहे त्या वेळेस काँग्रेस देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत , पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की देशातील MSP ची व्यवस्था पहिल्या प्रमाणेच चालू राहील आणि काही धान्याची आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे , तरीही विरोधी पक्ष राजकारण करत आहेत . मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी पावले उचलत आहे त्यावेळेला काँग्रेस अतिशय घाणेरडे राजकारण करून शेतकऱ्यांना भटकविण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस स्वतः एपीएमसी अधिनियम रद्द करण्याच्या विषयी आग्रही होता काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात कृषी सर्व सुधारणा विषयी लिहिले आहे पण प्रत्यक्ष संसदेत कृषी सुधारणा बिलाला विरोध करून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आपले खरे रूप शेतकऱ्यांना दाखवले आहे
कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येईल.कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर होण्यास मदत. मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल.इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध होईल.