महराष्ट्रा न्यूज बारामती प्रतिनिधी
बारामती मधील डॉ.महेंद्र यांना तुम्ही वापरत असलेल्या पेटीएमचे केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत डॉक्टरांकडून ओटीपी क्रमांक घेऊन त्यांची जवळपास ३ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या बाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात राकेश मल्होत्रा या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद डॉ. महेंद्र रमणलाल दोशी (वय वर्ष ६७) यांनी दिली आहे.
फिर्यादी, दोशी यांचे बारामती शहरामध्ये रमण हॉस्पिटल आहे. त्यांचे ॲक्सिस बॅंक व आयसीआयसीआय बॅंकेत खाती आहेत. ॲक्सिस बॅंकेत पती-पत्नीच्या नावे सलग्न खाते आहे. आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यामधून ते पेटीएम हे ॲप वापरत आहेत. त्यांना दि. २९ जुलै रोजी त्यांच्या बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर ९६४११७८५११ या मोबाईल क्रमांकावरून त्यांना फोन आला. सदर मोबाईल धारकाने त्यांना आपले नाव राकेश मल्होत्रा आहे. असे सांगत, मी पेटीएम ॲप कंपनीतून बोलत आहे.असे सांगितले. व आईएसएम त्यांना म्हणाला तुमचे पेटीएमची केवायसी पेपर अपूर्ण आहेत. जर आता आपण केवायसी साठी कगदत्रांची पूर्तता केली नाही, तर पुढील २४ तासात आपली केवायसी बंद होईल. आपले ॲप चालू ठेवण्यासाठी, केवायसी पूर्ण करण्या करीता मी सांगतो त्याप्रमाणे आपण करा, असे सदर इसमाने त्यांना सांगितले. त्या प्रमाणे त्यांना त्याने गुगल प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगीतले. सदर अँप डाऊनलोड केल्यानंतर सदर ॲपमध्ये आलेला आयडी क्रमांक त्याने डॉ.दोशी यांच्याकडून घेतला. व केवायसी अपलोड करण्यासाठी त्याने डॉ. दोशी यांना सात रुपये भरण्यास सांगीतले. त्यानुसार डॉ. यांनी सात रूपये ही रक्कम भरल्यावर त्याने त्यांना सांगितले कि, ॲक्सिस बॅंकेतून तुम्हाला कॉल आला कि,आपण त्यांना तुम्हाला आलेला ओटीपी सांगा, असे सांगितल्या नंतर डॉ.दोशी यांना ९१२२६००४७७०० या नंबरवरून फोन आला. व त्याना ओटीपीची मागणी करण्यात आली. त्यांनी त्यांना आलेला ओटीपी नंबर देताच तत्काळ त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून पाच ट्रान्झेक्शनद्वारे ३ लाख ३२ हजार रुपये त्यांच्या परस्पर ट्रान्स्फर करण्यात येऊन त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना फक्त सात ते आठ मिनिटा मध्येच घडली. त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यामधुन रक्कम ट्रान्सफर होताच त्यांना सदर रक्कम ट्रान्सफर झाल्याचे मेसेज त्यांच्या बँकेतील अधिकृत मोबाईल क्रमांकावर आले. त्यानंतर डॉ. दोशी यांनी तात्काळ बॅंकेत जावुन सदर खात्याच्या खाते उतारा घेतला. असता त्यांना सांगण्यात आले कि, तुमची आर्थिक फसवणूक झाली आहे, त्यामुळे तुम्ही तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करा. त्यानुसार डॉ.दोशी यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दाखल केली.