सातारा प्रतिनिधी – आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे या ठिकाणी, निर्भया पथक सातारा आणि बोरगांव पोलिस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक मछले यांनी महिला सुरक्षा आणि निर्भया पथकाची भूमिका या विषयावर तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रबोधन पर मार्गदर्शन केले, तसेच मुलींना आणि मुलांना आपलं शिक्षणाकडे लक्ष द्यावे काही अडी अडचणी असल्यास पोलिस दलाचे संपर्क करावा व कोणी गैरवर्तन केलेस त्यास योग्य ती कारवाई करून आम्ही वेळीच कायदेशीर समज देऊ , तसेच दैनंदिन जीवनामध्ये मुलींना होणारे छेडछाड तसेच मानसिक त्रास कोणी देत असल्यास आपण त्यास कशा प्रकारे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले …दरम्यान निर्भया महिला पोलिस राठवडे यांनी मुलींनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मनमोकळे पणाने आपले अडचणी सांगाव्या, या करिता निर्भया पथक पोलिस चौकी या ठिकाणी येऊन अर्ज कशा प्रकारे करावे हे सांगितले या कार्यक्रमावेळी सातारा विभागातील निर्भया पथकातील पो. कॉ. समाधान बर्गे, , पो .कॉ बादशहा नदाफ, प्रशांत मोरे उपस्थित होते तसेच या कॉलेजचे.प्राचार्य डॉ. अजितकुमार जाधव सर, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप लोखंडे, आणि आभार प्रा. जयमाला उथळे यांनी केले आणि सूत्रसंचालन प्रा. शितल सालवडागी यांनी केले. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.