महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिलकीस शेख (लोणंद)
लोणंद व लोणंद परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सामाजिक बांधिलकीतून, खबरदारीचा उपाय म्हणून, तसेच सर्वांचीच प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या उद्देशाने, लोणंद मेडिकल असोसिएशनच्या वतीने पाडेगाव येथील कोव्हीड केअर सेंटर (CCC) व सावित्री हाॅस्पिटल, लोणंद येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) मधील सर्व डाॅक्टरांना, स्टाफला व रूग्णांना, आयुर्वेदिक व होमिओपॅथीक औषधांचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती लोणंद मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ मिलिंद काकडे (पाटील) यांनी दिली.
लोणंद मधील, आयुर्वेदतज्ञ डाॅ. मिलिंद काकडे, डाॅ. निरंजन निगडे, डाॅ ज्योती काकडे तसेच होमिओपॅथी तज्ञ डाॅ गणेश दाणी, डाॅ प्रताप गोवेकर, डाॅ राहूल क्षीरसागर, डाॅ सचिन अडसूळ, डाॅ अनघा दाणी, डाॅ दिपाली क्षीरसागर व डाॅ माधुरी जाधव या टीमने या औषधांची योजना केली आहे.

आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचा वापर कोरोना विरोधीत लढण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा, लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ मिलिंद काकडे पाटील यांनी व्यक्त केली. यासाठी सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, वाई उपजिल्हाधिकारी संगिता राजापूरकर, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, खंडाळा तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ अविनाश पाटील, लोणंद नगरपंचायतचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले आदिचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेदतज्ञ डाॅ. निरंजन निगडे यांनी आयुर्वेदिक औषधांबरोबर आहार, व्यायाम, प्राणायाम, योग याचे महत्व सांगितले. तर होमिओपॅथी तज्ञ डाॅ. अनघा दाणी यांनी होमिओपॅथी औषधांची उपयुक्तता व त्याचे फायदे विषद केले. गेली 20 दिवस, लोणंद मेडिकल असोसिएशनचे “आयुष डाॅक्टर” पाडेगाव येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये 8 -8 तासाच्या आवर्तन पद्धतीने सेवा देण्याचे काम करत असल्याचे असोसिएशनचे सेक्रेटरी डाॅ राहूल क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित डाॅ दिपाली क्षीरसागर, डाॅ ज्योती काकडे, डाॅ अनघा दाणी डाॅ माधुरी जाधव इ महिला डाॅक्टरांनी कोव्हीड केअर सेंटर च्या कोरोना योद्ध्याला राखी बांधून, अनोखे “कोव्हीड रक्षाबंधन” साजरे केले. लोणंद येथील सावित्री हाॅस्पिटल येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये सेवा करणा-या डाॅक्टरांचे व स्टाफचे औषधी कीट डाॅ संजय शिवदे सर व डाॅ विद्याधर शिवदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी, डाॅ. शिवदे यांनी असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.या कोरोना कवच औषधी कीटसाठी, असोसिएशन बरोबर डाॅ. निरंजन निगडे, डाॅ जयेश रावळ, डाॅ कृष्णा गालिंदे, डाॅ निलेश सरक, डाॅ मिलिंद काकडे यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल उपाध्यक्ष डाॅ गणेश दाणी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी, लोणंद प्राथमिक केंद्राचे डाॅ. प्रशांत बागडे, डाॅ नानासाहेब हांडबर, डाॅ किशोर बुटीयानी, डाॅ दिपक गायकवाड, डाॅ. जयेश रावळ, डाॅ अविनाश शेळके, डाॅ मकरंद डोंबाळे, डाॅ अवधुत किकले, डाॅ सचिन भोईटे, डाॅ राहूल धायगुडे, डाॅ प्रताप गोवेकर, डाॅ सचिन अडसूळ डाॅ निलेश सरक तसेच समता आश्रमशाळेचे सचिव पवन सुर्यवंशी व कोव्हीड केअर सेंटर चा सर्व स्टाफ उपस्थित होता.






















