वालचंदनगर प्रतिनिधी
वालचंदनगर (तालुका इंदापूर )तालुक्यातील वालचंदनगर गांवचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर अर्जुन चिंचकर यांना वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला. गेली ३० वर्ष वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत सेवेत आहेत चिंचकर यांनी कोरोनाच्या काळात गेल्या तीन महिन्यात सतत कोरोनाच्या लढाईत शासन ,स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत, वालचंदनगर कंपनी याच्या सोबत राहून सतत काम करत असुन वालचंदनगर गावात तसेच आजुबाजुला असलेल्या गावात सॅनिटायझर ,मास्क असोनिक अल्बम गोळ्याचे वाटप करणे क्रारंटाईन लोकांना राहण्याची सोय व चाय, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करणे कोणतेही काम असेल तर त्याना तात्काळ मदत करणे गावात व परिसरातील जनतेला तात्काळ आरोग्य सुविधा मिळवून देणे.लोकांना आर्थिक मदत करणे. गरजु कुटुंबाना मदत करणे. असे कामे ते सतत करत असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांना खरा कोविड योद्धा म्हणून वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर व्ही.पी.शुक्ला यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी एच.आर.विभाग,अॅडमिनिट्रेशन
विभाग, सिक्युटरिटी,हाॅस्पिटल,सिव्हिल,सॅनिटेशन ,मेंटेनन्स, प्लॅनिंग,शिपिंग ,सेट्रीफ्युगल,ट्रान्स्पोर्ट व परचेस विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना महामारीच्या संकटकाळात ज्यांनी ज्यांनी आपले सर्वस्वी योगदान देऊन मोलाची भुमिका बजावून उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल 120 कोरोना योध्दाचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आदी मान्यवर उपस्थित होते.






























