बारामती : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर हायस्कूलचे शिक्षक गदादे यांनी आपल्या मुलाचा श्रीयांश याच्या पहिल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ऊसतोड मजुरांना कपडे वाटप केले आहेत.

गदादे यांनी थोपटेवाडी येथे ऊस तोड करण्यासाठी आलेल्या जवळपास 50 ऊसतोड मजुरांना हे कपडे वाटप केले आहेत. सध्या अनेक पालक मुलांचा वाढदिवस हजारो रुपये खर्च करून धुमधडाक्यात साजरा करत आहेत. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो. या भावनेतून गदादे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत या ऊसतोड मजुरांना कपडे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी सिद्धेश्वर हायस्कूलचे शिक्षक राहुल पानसरे, अमोल जगताप, गुरव सर, आशा प्रकल्पचे तुषार जाधव, पत्रकार सचिन वाघ, टोळी मालक विकास पानसरे हे उपस्थित होते.






























