महाराष्ट्र न्यूज सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सध्या जगात कोरोनाचा हाहाकार असल्याने जगभरात असणारी जगतविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी. जयंती तालुक्यातील करंजे येथील ग्रामपंचायत कार्यालयत साध्या पद्धतीत थोड्या मन्यावरच्या उपस्थित संपन्न . सरपंच जया गायकवाड व मा.उपसरपंच कालिदास सावंत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय आणि साहित्यनगर येथेही प्रतिमेचे गुलाबपुष्प वाहून पूजन करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वशासकीय नियम व सोशल डिस्टन्स चे पालन करत साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली , दरवर्षी ढोल- तश्याच्या गजरात गावातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात येते …परंतु यावर्षीची शतक महोत्सवी वर्षे असूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने जयंती साजरी करताना त्या सर्व गोष्टीची उणीव जाणवते.
या जयंती कार्यक्रमाला पुणे जिल्हा युवक मातंग नवनिर्माण सेना अध्यक्ष सचिन पाटोळे , प्रफुल्ल पाटोळे, अविनाश पाटोळे,शेखर सतीश पाटोळे,आकाश भिसे,सनी पाटोळे,शेखर पाटोळे,सुनील माधव पाटोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.