महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या व राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या बैठकीत , समान निधि योजनेअंतर्गत राज्यातील दोनशे ग्रंथालयांना संगणक व यूपीएस हे भेट योजनेअंतर्गत मंजूर केले आहेत .
राज्यातील एकूण तेरा ग्रंथालयांना इमारत बांधकाम करीता प्रत्येकी रक्कम रुपये दहा लाख मंजूर केले आहेत , विशेष म्हणजे यात “ड”वर्गातील वाचनालयाचा समावेश आहे , तसेच राज्यातील सहाशे ग्रंथालयांना रॅक , डीप्सले स्टँड , तर ग्रंथ भेट योजनेअंतर्गत एक हजार दोनशे वाचनालयांना पुस्तके मंजूर केली आहेत .लाॅकडाऊन झाल्यानंतर ही सर्व प्रकिया वितरित केली जाणार आहे .
या महत्वपूर्ण बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव , आय. ए.एस. सौरभ विजय , उपसचिव विनय मालवणकर , प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड , राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ रामेश्वर पवार , उपस्थित होते . अशी माहिती मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव मगर यांनी सांगितले .