भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्त 5 सप्टेंबर हा दिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. सातारा जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे हे अशा आदर्श शिक्षकांचा जिल्हा स्तरावर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कोविड १९ या रोगाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दुःखद निधन झाल्याने, राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असल्याने हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे.यंदा पुढील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे
सागर कांबळे धावडशी ता. सातारा: सुभाष जाधव, कटापूर, ता.कोरेगाव: श्रीमती सुजाता कुंभार, गोसावीवाडी, माण : शिवाजी कदम, कुळकजाई, माण: विष्णू पाचांगणे, बुधावलेवाडी, खटाव: बाबासाहेब जाधव, होळीचागाव, खटाव: सचिन कुराडे ,निंभोरे, फलटण: गणेश तांबे, कारंडेवस्ती ,फलटण: दत्तात्रय चव्हाण ,शिरवळ ,खंडाळा: श्रीमती अंजना जगताप, लोणी, खंडाळा: महेश संकपाळ, धावडी ,वाई :संजय लोखंडे, खानापूर, वाई : सुभाष गवळी, वाघदरे , जावली: संतोष लोहार निपाणीमुरा, जावली: श्रीमती योगिता बनसोडे, मुळगाव, पाटण: श्रीमती विद्या गाढवे, घाटेवाडी, पाटण: श्रीमती सुवर्णा शेजवळ, कोर्टी, कराड: श्रीमती सुरेखा वायदंडे, अक्षय नगर नंबर एक, कराड: श्रीमती सुजाता ढेबे , कुंभरोशी, महाबळेश्वर: असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा कोळेकर यांच्यासह सभापती शिक्षण क्रीडा व अर्थ समिती , मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा यांनी यादी जाहीर केली आहे.