इंदापूरच्या तहशिलदार सोनाली मेटकरी यांना डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिले धनगर समाजाच्या मागणीचे रक्तलिखित निवेदन
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
धनगर समाजाच्या प्रलंबित असणाऱ्या एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी त्वरित करावी व इतर मागणीसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत धनगर ऐक्य अभियांन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुरुवार , दि.१३ रोजी धनगर समाजाच्या मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन देऊन मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ. शशिकांत तरंगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागण्यांचे निवेदन इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले.
यावेळी डॉ. तरंगे म्हणाले महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार यांना आज धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाची एसटी प्रवर्ग ची अमलबजावणी तातडीने करा, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा, व 1000 कोटी रुपयांची तरतूद त्वरित करा, मेंढपालवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या या मागण्या असलेले रक्तलिखित निवेदन धनगर ऐक्य अभियानामार्फत महाराष्ट्रातील तहसिलदार यांना देण्यात आली आहेत.
आमच्या मागण्यांच्या निवेदनाची सरकारने दखल घेऊन त्वरित अमलबजावणी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिला आहे .यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सदस्य महेंद्र रेडके , पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे , पोपट पवार , ज्ञानदेव डोंबाळे , विशाल मारकड , दत्तू पांढरे , धनाजी देवकाते , महादेव पांढरे , वैभव तरंगे , लेमन गावडे , नितीन गोफणे ,आण्णा शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते .