महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
निंभोरे ता फलटण गावाच्या हद्दीमध्ये दि २एप्रिल रोजी जुगार अड्ड्यावर छापा टाकून फलटण ग्रामीण पोलिसांनी १२ आरोपींसह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर म.जु.प्रति.कायदा कलम १२ ( अ ) , भा द वि सं १८८,२६ ९ .२७० म.कोविड -१ ९ अधिनियम २०२० चे कलम आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ) नुसार गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याची फिर्याद पो हवालदार तुकाराम सावंत यांनी दिली असून फलटण ग्रामीण स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार,निभोरे गावाच्या हद्दी मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे उल्लंघन करून आरोपी बबन जगन्नाथ मानकर रा. लासुरणें ता.इंदापुर,दयानंद किसन गाडे रा.शिवताकरवाडी ता.पुरंदर, ओंकार अरुण तपासे रा.म्हल्हार पेठ सातारा, किरण एकनाथ गाडे रा.कापुरहोळ ता.भोर , समीर जमशेद मुलाणी रा.पिंप्रद ता.फलटण,गजानन महादेव डोंबाळे रा.डोंबाळवाडी ता.फलटण, राजेश शेवंतीलाल शहा रा.निंभोरे ता.फलटण,अनिल अंकुश यादव रा.तरवडी लोणी काळभोर ता.हवेली,महेश बाळु जगताप रा.मंगळवार पेठ फलटण , चंदन अशोक काकडे रा.कोळकी ता.फलटण ,शरद बाळु खवळे रा.निंभोरे ता.फलटण , रितेश रामस्वरुप नंदा रा , हडपसर पुणे हे जुगार खेळताना आढळून आले असून यांना अटक केली असून त्यांच्याकडून १२लाख ८हजार १५० रुपयांचा मुद्देमाल यात दोन चार चाकी वाहने,रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले असून पुढील अधिक तपास पो उपनि शेख करत आहेत.