सातारा : सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणातील रायगड , महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. या जिल्हातील पूरग्रस्तांना मदतीची गरज असल्याने तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून CMS संघटनेने संघटनेमधील सभासदांना मदतीचे आव्हान केले. आव्हानाची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राबाहेरील तसेच विदेशातील CMS च्या सभासदांनी भरगोस प्रतिसाद दिला. काही सभासदांनी जीवनावश्यक वस्तू स्वरूपात मदत केली तर काही सभादांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. CMS Overseas ग्रुप तर्फे 90 हजारांची आर्थिक मदत पूरग्रस्तांसाठी मिळाली.
CMS संघटनेच्या पदअधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन अनेक परिवारास महिनाभर पुरेल अश्या पद्धतीने जीवनावश्यक किट तयार केले. तांदूळ, ज्वारी, गहू, डाळी, तेल, साखर,चहापावडर, पोहे, मसाला, मीठ, मिरची, साबण, कोलगेट, बिस्कीट, फरसाण, मेणबत्ती, माचीस इत्यादी वस्तू एका किटमध्ये होत्या.अतिवृष्टीमुळे ज्यांचे संपूर्ण घरदार पुरामध्ये वाहून गेले आहे अश्या गरजुंना जीवनावश्यक किट सोबत साड्या, कपडे, भांडी सुद्धा वाटप केले.
CMS संघटनेच्या पदअधिकाऱ्यांनी विविध गावात आतापर्यंत 1500 किट गरजू पूरग्रस्तांना वाटप केले. अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिथे जाण्यास रस्ता नाही तिथे ८-१० KM पायपीट करून गरजू पूरग्रस्तांना मदत CMS संघटनेच्या पदअधिकाऱ्यांनी पोहच केली.
भूस्खलन झाल्यामुळे संपूर्ण कोंढावले गाव हे स्थलारांतरित करण्यात आले. CMS – छत्रपती मराठा साम्राज्य टीमने गावात किराणा तसेच सर्वाना अन्न शिजवता यावे म्हणून 2 पातेली, 5 बादली, 5 घमेली, मग, वघराळे, व सामूहिक स्वयंपाकाची सर्व भांडी ,बटाटे व कांद्याची पोती व 1 क्विंटल धान्य असे सर्व साहित्य कोंढावले गावातील पूरग्रस्तांच्या हाती सुपूर्द केले.
CMS सातारा टीम मधून ओमकार देशमुख, शुभम महामुलकर, बाबा जाधव, दीपक माने ,दत्ता शिंदे,योगिता घाडगे ,अमृत शिंदे, कैलास बाकले,सूर्यकांत मोहिते,अतुल भोसले , सुरज गायकवाड, राज साळुंखे,आकाश रेठरेकर, मिलिंद माने,वैभव जाधव,करण चव्हाण,शीतल शिंदे,प्रियांका साबळे,सुष्मा पवार,आनंद गुळुमकर, अक्षय गाढवे, राहुल चव्हाण प्रत्यक्ष उपस्थित होते .
सामाजिककार्यात सातारा, जळगाव, मुंबई, पुणे, बीड, धुळे, अहमदनगर, गुजरात, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर अजून इतर जिल्ह्यातील CMS संघटनेच्या पदअधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी विशेष मेहनत घेतली.
सामाजिककार्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व सभासदांचे CMS – छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेचे संचालक ओमकार देशमुख, जितेंद्र पवार, धनराज भोसले ह्यांनी आभार मानले.