शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी माझा प्रयत्न असेल : आ. जयकुमार गोरे
शासनाकडे पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार :खा. रणजितसिंह निंबाळकर
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : म्हसवड
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मागील तीन दिवसापूर्वी माण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये बळीराजाच्या शेतातील पिकांचे व फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणीसाठी खासदार आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते.
माणतालुक्यातील वाघमोडेवाडी,गोंदवले खुर्द,देवापूर, पळसावडे येथील शेतीची व फळबागांची आज पाहणी केली. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर,माणखटावचे आमदार जयकुमार गोरे,याप्रमुख मान्यवरांसह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे,दहिवडी नगराध्यक्ष धनाजी जाधव,फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव,म्हसवड नगरपरिषदेचे गटनेते अकिल काझी, माजी सभापती अतुल जाधव,अभिजीत निंबाळकर,सिध्दार्थ गुंडगे,बी एम अब्दागिरे यावेळी पाहणी दौऱ्यात होते.

यावेळी वाघमोडेवाडी येथील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कांदा पिकांचे ,गोंदवले खुर्द येथे कांदा व पडलेल्या ऊसाची पाहणी केली तसेच देवापूर पळसावडे येथील द्राक्ष बागांची पाहणी केली.
यंदा वादळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरीवर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही थेट शेतीच्या बांधावर येऊन अडचणी जाणून घेत आहोत असे खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
आ.गोरे म्हणाले,माण मध्ये आता ओल्या दुष्काळाचे संकट आले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या भीषण परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत.शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी माझा प्रयत्न असेल.लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत.






























