महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण
बारामती तालुक्यातील ब-हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करण्या संदर्भातील अध्यादेश आज काढण्यात आला. पुढे मागे बारामती हा जिल्हा होणार आहे. तसेच राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक, औद्योगिक कारणामुळे पुणे जिल्ह्यात पुण्यानंतर बारामती शहराची एक नवीन ओळख आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलीस उप मुख्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव गेले अनेक दिवस पासूनचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेले क्षेत्रही अधिग्रहित करण्यात आलेले आहे. उप मुख्यमंत्रीपदी अजित पवार आल्यानंतर या ठिकाणच्या कामाला गती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागात पोलिस बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचण्यास विलंब होत होता. यासाठी बऱ्हाणपूर येथे पोलीस मुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल व परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल अशी यामागची भूमिका आहे .पोलीस उप मुख्यालयाला मंजुरी देताना पदनिर्मिती बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.या ठिकाणच्या प्रशासकीय इमारत व इतर अनुषंगिक अनावर्ती खर्च सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन वार्षिक योजनेतून करावा असे अध्यादेशात नमूद केले आहे .यामुळे बारामतीसह इंदापूर, दौंड पुरंदर, या चार तालुक्यांना फायदा होणार आहे. बारामती पाटस रस्त्यावर हे पोलीस उप मुख्यालय होणार आहे |