महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी :गणेश पवार
बीएसएफ मध्ये अविरत वीस वर्ष प्रामाणिक आणि अभिमानास्पद सेवा करून. ब्लॅक कॅट कमांडो ट्रेनिंग, ४०आठवडे शारीरिक व वेगवेगळी शस्त्रास्त्र प्रशिक्षण, एन एस जी प्रशिक्षण, वैयक्तिक सुरक्षा प्रशिक्षण, देशातील VVIP लोकांसाठी झेड प्लस सुरक्षा मध्ये सक्रिय सहभाग, अनेक प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये सुवर्णपदक विजेतेपदाचा मान मिळविला. साखरवाडी व पंचक्रोशी चे नाव देशपातळीवर गाजविले. आज देश सेवा समाप्त होऊन साखरवाडी माय भूमीमध्ये सोशल डिस्टन्स चे नियम पाळून त्यांचे दैदिप्यमान स्वागत करण्यात आले.
प्रथमता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्राच आराध्य दैवत श्री भवानी मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, सजवलेल्या जीप गाडीमध्ये, ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये ज्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली ज्या मैदानावर हे फौजी घडले ती प्रशाला म्हणजे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज साखरवाडी या प्रशालेमध्ये जवान अरुण चव्हाण, सौ कौशल्या चव्हाण त्यांचे आई-वडील बाळासाहेब चव्हाण, सौ लक्ष्मी चव्हाण त्यांचे चिरंजीव ओम, कन्या कु श्वेता, कु. अंजली यांच्या शुभहस्ते प्रशालेमध्ये वृक्षारोपण व त्या सर्वांचे स्वागत सत्कार करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य गंगवणे सर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सजवलेल्या जीप गाडीमध्ये पिंपळवाडी मध्ये श्री गणराया, राजे उमाजी यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. साखरवाडी पिंपळवाडी मधील सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला माता-भगिनी यांनी जवान अरुण चव्हाण फौजी यांचे औक्षण, शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ व पुष्प वर्षाव करून , ताशांच्या गजरात सहर्ष स्वागत केले.
फलटण तालुक्यामध्ये प्रथमच सेवानिवृत्तीनंतर माय भूमीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन साखरवाडी रक्षक ग्रुप, मित्र परिवार, ग्रामस्थ, पै पाहुणे यांच्यावतीने करण्यात आले. अभिमानास्पद सेवेबद्दल रक्षक ग्रुप मधील कार्यरत सदस्यांच्या कार्याला सलाम. कार्यक्रमाचे गोड आभार प्रदर्शन सत्कार मूर्ती अरुण चव्हाण फौजी ब्लॅक कॅट कमांडो यांनी व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तुषार मोहिते सर यांनी केले .