महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब-इंदापूर)
दिल्ली भेटीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात हर्षवर्धन पाटील यांनी देशातील साखर उद्योगाला मदत करणेसाठी केंद्रीय मंत्री ग्रुप समितीचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा , कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर , अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान आदी मंत्रीगण सकारात्मक असल्याचे सांगितले .यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगाला दिलासा मिळणेकामी साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे.

इथेनाॅलसाठी २५ वर्षांचे धोरण जाहीर करावे कि ज्यामुळे या उद्योगात गुंतवणूकदार गुंतवणूक करतील , चालू वर्षीही ऊसाचे जास्त गाळप होणार असल्याने ७० लाख टन साखर उत्पादनास परवानगी मिळावी , साखरेची किंमत व ऊसाची एफआरपी यांत वाढ करण्यात यावी , एनसीडीसी व एसडीएफ फंडातून साखर कारखान्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे , अशा मागण्या करण्यात आल्या .
महाराष्ट्रात चालू वर्षी ऊसाचे मोठे क्षेत्र असल्याने सर्व ऊसाचे गाळप करणेसाठी केंद्र सरकारने तातडीने पॅकेज जाहीर करावे याप्रमाणे मागण्या करण्यात आल्या असल्याचे व केंद्र सरकार या संदर्भात अतिशय सकारात्मक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले .




























