महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :अमोल राजपूत (वालचंदनगर)
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोरोना विषाणुचा संसर्ग दिवसेनादिवस वाढत चाललेला असुन मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन व बफर झोन असुन सदर झोनमध्ये विना मास्क तसेच फिरणा-या नागरिकांवार वालचंदनगर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
तसेच पोलीसांनी ५किराणा दुकांनदार व १ सलुन व्यवसाईक यांच्यावर विना मास्क तसेच सोशल डिस्टन्स चे नियम न पालन केल्यामुळे त्यांचेवर भारतीय दंड संहिता कलम २६९, १८८ या कलान्वये कारवाई केली आहे
पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनामास्क फिरणा-या नारगिकांनावर ४४३ केसेस करुन त्यांचेकडुन ४४,३०० रुपये चा दंड वसुल करण्यात आलेला आहे. कंटेनमेंट व बफर झोन मध्ये विनालायसन्स फिरणा-या १७०मोटारसायकल स्वरावर कारवाई करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन ३९,०००/- रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.
तरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना वालचंदनगर पोलीस स्टेशन कडुन आवाहन करण्यात येते की, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणाण कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असुन पोलीस स्टेशन हद्दीमधील ९ नागरिकांचा कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यृ झाला आहे. तरी नागरिकांना शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे, विना मास्क घराबाहेर पडु नये पोलीस प्रशासनाला सहकार्य वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करावे.