बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात सध्या कोरोण्याची वाढती संख्या पाहता सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे तसेच घरा बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे तसेच सॅनिटायझर व वारंवार हात धुणे व स्वतःची काळजी घेणे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी केली आहे असे असताना कोरोना न झालेल्या ना सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय अश्या अफवां मात्र पसरत आहे … अशी अफवा पसरणाऱ्यावर आता गुन्हा दाखल होणार असे आवाहन वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आवाहन केले आहे.




































