महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले ( फलटण )
बारामती येथील कृषि महाविद्यालयांतर्गत चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या करीता कृषि कार्यनुभव कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते.
या महाविद्यालयांतर्गत फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावात ग्रामीण कृषि कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत मयुरी राजेंद्र कुंभार या विद्यार्थिनीने अमृत पाणी या बाबतचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी साखरवाडी गावातील 50 शेतकरी हजर होते. या कृषिकन्या मयुरी कुंभार या विद्यार्थिनीने शेत्कर्याना अमृत पाणी बनवनिण्याचे प्रात्यक्षिक शिकविले. या बाबतची माहिती देत असताना अमृत पाण्याचे महत्व व त्याची पीकां करीता असणारी उपयोगीता शेत्कर्य्यान्ना समजावून सांगितली. तसेच जैविक शेतीचे महत्व पटवून दिले. वर्तमान व भवीष्य काळाचा वेध घेता साखरवाडी गावातील शेत्कर्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग स्विकारला पाहिजे, असे आवाहन कृषिकन्या कु. मयुरी कुंभार हिने केले.

































