जि.प . सातारा मधील वेग वेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत . या बाबत सातत्याने कास्ट्राईब आपणाकडे निवेदने देऊन तक्रार करीत आहे तरी ही विविध खाते प्रमुखाकडुन तसेच गट विकास अधिकारी यांचे कडुन सा प्र .विभागाने अद्याप कोणातीच माहिती आपणाकडे दिली नाही . त्यामुळे याही वर्षीच्या बदली धोरणात जि प मधील झारीतील शुक्राच्याऱ्यांना बदली मध्ये सुट मिळणार हे निश्चीत आहे . एकुणच काय तर जि प . मधील मंडळी आपली दिशाभुल करण्यात यशस्वी होणार का? की आपण या झारीतील शुक्राच्याऱ्यांना घरचा आहेर देणार . मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणुन स्टेनो ग्राफर या पदाच्या कर्मच्याऱ्याची वर्णी लागणे गरजेचे असताना मात्र श्री देसाई यांनाच वर्षानुवर्षे स्वीय्य सहाय्यक पदावर का ठेवले जाते . वरीष्ठ सहाय्यक (देसाई ) हे किती वर्ष त्याच ठिकाणी काम करतात त्यांना बदली धोरणात सामावुन घेणार का ? की संबंधीत टेबलचे काम करण्यास फक्त हेच कर्मचारी लायक आहेत का ? जि प मध्ये बाकीचे कर्मचारी लायक नाहीत का ? की यापुढेही जि प मधील ठरावीक कर्मच्याऱ्यांच्या मक्तेदारीला जि.प प्रशासन प्रमुख म्हणुन आपण प्रोत्साहन देणार . कारण अद्याप जि . प मधील बेकायदेशीर प्रतिनियुक्तीवर असणारांना खाते प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही . नक्की या मागचे गौडबंगाल काय ? याच्या खोलात जाणे गरजेचे आहे . कारण म्हातारी मेल्याचे दु :ख नाही पण काळ सोकावता कामा नये .
राज्याच्या ग्राम विकास विभागाने जि प . च्या कर्मच्याऱ्यासाठी बदली धोरण आहे ते फक्त सर्वसामान्य कर्मच्याऱ्यासाठीच आहे का ? कारण वर्षानुवर्ष दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मच्याऱ्यांची इच्छा असताना ही सुगम भागात बदलीने येता येत नाही . ही शोकांतीका आहे या बाबत जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागातील कर्मचारी यांची सटीक माहीती घेऊन या वर्षीच्या बदली धोरणाची अंमलबजावणी करावी . अन्यथा कास्ट्राईब संघटनेस या मोनोपॉलीच्या विरोधात औद्योगीक न्यायालयात दाद मागावी लागेल – जिल्हाध्यक्ष – अजित वाघमारे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सातारा